भवानी नगर FPC

शेतकरी उत्पादक कंपनी
Indian Farming Landscape

आमच्याबद्दल जाणून घ्या

भवानी नगर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड ही शेतकऱ्यांच्या मालकीची कंपनी आहे.

शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य भाव मिळवून देणे, खर्च कमी करणे आणि शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

आमची उद्दिष्टे

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विविध योजना, प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.

शेतकऱ्यांना शासकीय योजना, अनुदान (Grant) व सबसिडी यांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहाय्य करणे.

दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, बोकड पालन व इतर पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करणे.

शेती व पूरक व्यवसायासाठी प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देणे.

शेतकऱ्यांना शाश्वत शेती करण्यासाठी सक्षम बनवणे आणि शेतीला फायदेशीर उद्योग म्हणून विकसित करणे.

Export Quality फळे व भाजीपाला तसेच विदेशी भाजीपाला यांचे उत्पादन वाढवणे आणि त्यासाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

दृष्टीकोन (Vision)

प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि शेतीला एक शाश्वत व्यवसाय म्हणून विकसित करणे.

ध्येय (Mission)

शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांच्या शेतीमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, दर्जेदार निविष्ठा स्वस्त दरात पुरवणे आणि प्रक्रिया उद्योगाद्वारे मूल्यवर्धन करणे.